फलटण – गेल्या चार दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे ढवळ (ता. फलटण) येथील श्री ढवळाईदेवी मंदिराजवळील ओढ्यावर असलेला पूल खचला. या पूलाच्या खचल्यामुळे वस्तीवरील नागरिकांना तसेच देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या परिस्थितीची गंभीर दखल घेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तत्काळ निर्णय घेत सहा सिमेंटचे तीन फूट रुंदीचे व नऊ फूट लांबीचे पाईप उपलब्ध करून दिले. या पाईप्सच्या सहाय्याने पुलाचे काम सुरु करण्यात आले असून, नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
या उपक्रमाबद्दल ढवळ ग्रामस्थांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे विशेष आभार मानले आहेत.