
जीवनात सुख,शांती व समाधान प्राप्त करण्यासाठी धम्माच्या मार्गाने श्रोतापन्न होण्याचा प्रयत्न करा – भंते काश्यप
फलटण : भगवान बुद्धांनी दिलेला धम्म हा न्याय,नीती व सदाचारावरती आधारित असून त्याचा मूल आधार अनित्य, अनात्म व दुःख या तीन सिद्धांतावर आधारित आहे. तेव्हा समस्त मानव जातीला सुख समाधान व शांती हवी असेल तर धम्माचे विचार आत्मसात करून त्याचे आचरण केले तरच आपण श्रोतापन्न होऊन आपल्याला सुख, शांती व समाधान मिळणार आहे. असे पूज्य भंते काश्यप जी यांनी धम्मदेसना देताना सांगितले. ते भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने मौजे आरडगाव या ठिकाणी वर्षावास प्रवचन मालिकेचे पंधरावे पुष्प गुंफताना बोलत होते.
समता सैनिक दलाचे केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले यांनी समता सैनिक दल,महार रेजिमेंट ची निर्मिती याविषयी मार्गदर्शन केले. समता सैनिक दलाच्या वतीने बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी भाष्य केले. महार रेजिमेंट ची स्थापना होण्यापूर्वी शिवकाळामध्ये आणि त्याच्याही अगोदर महार या लढवय्या जातीने कशा स्वरूपाचे योगदान दिले आहे याचे विश्लेषण ही त्यांनी केले. आपली चळवळ गतिमान होण्यासाठी समता सैनिक दल सक्षमपणे उभा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. येणाऱ्या काळातही सैनिकांचे शिबिर आयोजित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
तथागत भगवान गौतम बुद्धांनी विहाराची निर्मिती कशासाठी केली? आणि विहारामधून लोकांनी काय ज्ञान घ्यावे? याविषयी थोडसं मार्गदर्शन करणारे भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव यांनी प्रत्येक रविवारी चला बुद्ध विहारी ही संकल्पना गीताच्या माध्यमातून मांडून उपस्थिताचे मन प्रसन्न करून प्रबोधन केले.
त्याचबरोबर ‘वर्षावास’ म्हणजे काय? फलटण तालुक्याचे महासचिव आयु. बाबासाहेब जगताप सर यांनी वर्षावासाचे महत्त्व सांगत असताना भगवान गौतम बुद्धांनी त्याची सुरुवात आषाढ पौर्णिमेला केली आणि अश्विन पौर्णिमेला त्याची समाप्ती झाली. यावर सुंदर प्रवचन दिले. यासोबत भारत सरकारच्या वतीने जून महिन्यामध्ये जनगणनेची माहिती देताना फलटण तालुक्याचे मार्गदर्शक अभ्यासू व्यक्तिमत्व आयु. सोमीनाथ घोरपडे सर यांनी उपस्थित बांधवांना पाली भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला असून आपण सर्वांनी प्रगनकांना अवगत असलेल्या भाषांमध्ये पाली भाषेची नोंद करण्याची सूचना केली. त्याचप्रमाणे धर्माच्या रखान्यात मध्ये बौद्ध व जातीच्या कॉलम मध्ये महार असा उल्लेख करण्याची सूचना दिली.
फलटण तालुक्यातील प्रत्येक घरात बौद्ध धम्म पोहोचला पाहिजे. अशी ज्याची मनोकामना आहे असे फलटण तालुक्याचे भूषण बौद्ध धम्माचे अभ्यासक व प्रचारक तथा नीतिमान जीवन जगणारे नेतृत्व आयु. तुषार मोहिते सर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा धम्मग्रंथ भेट देण्यात आला. भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने सर्व उपस्थितांना संविधानाची उद्देशिका तसेच सूत्रपटनाची छोटी पुस्तक भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने देण्यात आली.
या कार्यक्रमासाठीआर पी आय (सातारा) चे युवक अध्यक्ष स्वप्नील अशोक गायकवाड , उपाध्यक्ष विजय येवले ,संजय निकाळजे माजी सरपंच अजित भोईटे, पोलिस पाटील अमित भोईटे, माजी सरपंच बाळकृष्ण भोईटे, शैलेश भोईटे, ग्रामसेवक गोरे मॅडम उपस्थित होत्या.संपूर्ण कार्यक्रम भीमगौरव तरुण मंडळ,माता रमाई महिला मंडळ या दोन्ही मंडळाच्या वतीने संपन्न झाला.पंचशील बुद्ध विहार अध्यक्ष प्रमोद काकडे, प्रकाश कदम, गौतम काकडे, बाळासाहेब काकडे, शिवाजी काकडे, सतीश काकडे, संतोष सुरेश काकडे, गणेश प्रकाश कदम, संतोष काकडे, निवृत्ती काकडे, आशा काकडे, रंजना काकडे, उत्तम काकडे व इतर सर्व काकडे परिवार यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले.
सूत्रसंचालन फलटण तालुक्याचे कोषाध्यक्ष आयुष्यमान विठ्ठल निकाळजे सर यांनी केली.तर कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सातारा जिल्हा पूर्व विभागाचे प्रचार आणि पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. दत्तात्रय खरात सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहून उपस्थित त्यांना शुभेच्छा देऊन श्रामणेर शिबिर या विहारातून घेण्याची सूचना केली. या कार्यक्रमासाठी संस्कार सचिव आयु. बजरंग गायकवाड सर, कार्यालयीन सचिव आयु. चंद्रकांत मोहिते सर, संघटक आयु. आनंद जगताप, प्रचार आणि पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु.रामचंद्र मोरे सर त्याचबरोबर बौद्ध उपासक सागर काकडे या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.








