
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Sonu: छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. गेल्या काही वर्षांपासून हा शो अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. मात्र, गेल्या काही काळात अनेक कलाकारांनी एकापाठोपाठ एक हा शो सोडला आहे. दरम्यान असित मोदी आणि त्यांच्या शोमधील काही कलाकारांमधील वादही चर्चेत आले होते. आता नुकतीच अशी बातमी आली आहे की, ‘तारक मेहता…’ या मालिकेत ‘सोनू भिडे’ची भूमिका साकारणारी पलक सिधवानीने प्रॉडक्शन हाऊससोबतचा करार मोडला आहे. यामुळे आता असित मोदी यांची टीम पलकवर कायदेशीर कारवाई करू शकते, असेही सांगण्यात आले होते. आता खुद्द पलक सिधवानीने या बातम्यांवर मौन सोडले आहे.








