
फलटण – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या यांच्या प्रयत्नाने फलटणला एम एच 53 नंबर मिळाला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून फलटण येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास मंजुरी मिळाली होती . आज त्याप्रमाणे शासन निर्णय होऊन फलटणला स्वतंत्र असा एम एच 53 हा स्वतंत्र नंबर मिळाला आहे. राज्य शासनाने आज शासन निर्णय करून फलटणला भाडेतत्त्वावर किंवा शासनाची मालकीची जागा घेऊन ताबडतोब हे कार्यालय सुरू करावेत असे आदेश दिले आहेत.फलटणच्या जनतेने बऱ्याच वर्षापासून पाहिलेलं स्वप्न खासदार रणजितसिंह सिंह नाईक निंबाळकर यांनी पूर्ण केल्यामुळे सातारला जाणारा लोकांचा लायसन असेल व इतर कामासाठी व वाहनधारकांना किंवा आरटीओ एजंट यांना आता सातारा जावे लागणार नाही.त्यामुळे वेळेची व पैशाची बचत होणार आहे.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणच्या अनेक विकास केले त्यामध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा विकासाचा पुढचा पाऊल आहे त्यामुळे जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे.








