“आहे साहित्त्याची खान… अण्णाभाऊचं लिखान…!”

0
102
“आहे साहित्त्याची खान… अण्णाभाऊचं लिखान…!”

फलटण : छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियाच्या चौकाचौकामध्ये गाणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरू मानून त्यांचे विचार आणि कार्य संपूर्ण देशभर लोकशाहीरीच्या माध्यमातून पोहोचवणारे, भारतरत्न तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांच्या ५६व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

कम्युनिस्ट विचारसरणीचे असलेले अण्णाभाऊ साठे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व होते. लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, कामगार, वंचित आणि उपेक्षित समाजाच्या व्यथा आपल्या लेखणीतून प्रभावीपणे मांडल्या.

त्यांची लोकचळवळीवर आधारित प्रसिद्ध लावणी “माझी मैना गावाकडे राहिली” आजही जनमानसात तितकीच प्रिय आहे. दुसऱ्या महायुद्धातील रशियाच्या अस्तित्वासाठी चाललेल्या लढाईवर त्यांनी लिहिलेला “स्टालिनग्राडचा पोवाडा” इतका प्रभावी ठरला की रशियातील लोक त्यांच्या विचारांनी प्रभावित झाले आणि रशियात त्यांच्या स्मरणार्थ पुतळाही उभारण्यात आला.

साहित्य, गीत, पोवाडा, कथा-कादंबरी यांतून त्यांनी सर्वसामान्यांच्या दुःखांना आवाज दिला. अण्णाभाऊंच्या लेखणीने वंचितांचे दुःख शब्दरूप घेऊन समाज परिवर्तनाची मशाल पेटवली.

आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना आपण त्यांच्या कार्याची आठवण ठेवूया आणि समतेच्या, संघर्षाच्या आणि न्यायाच्या वाटेवर चालण्याचा निर्धार करूया.