Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रकार्यकर्त्यांकडून माढा , सातारा किंवा पुणे येथून आपण निवडून लढवावी अशी आग्रही...

कार्यकर्त्यांकडून माढा , सातारा किंवा पुणे येथून आपण निवडून लढवावी अशी आग्रही मागणी केली आहे : शरद पवार

फलटणः पुणे येथे कार्यक्रमांमध्ये माजी केद्रीय तथा विद्यमान राज्यसभा खासदार शरद पवार यांनी आपल्याला कार्यकर्त्यांकडून माढा , सातारा किंवा पुणे येथून आपण निवडून लढवावी अशी आग्रही मागणी केली आहे . खासदार शरद पवार यांनी या केलेल्या विधानामुळे आगामी माढा लोकसभा मतदारसंघात खासदार शरद पवार हे निवडणूक लढणार का?

माढा लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार कोण असणार हे अजून समोर आले नाही . तसेच  शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघाची निर्मिती झाल्यानंतर स्वतः या माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते . त्यामुळे शरद पवार यांना पुन्हा या माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून येणे अवघड नाही . अशी चर्चा सुरू झाली आहे .

पुणे येथील एक जाहीर कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी सांगितले की माढा लोकसभा मतदारसंघातून सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे की ; मी लोकसभेची निवडणूक लढवावी असे विधान त्यांनी नुकतेच केले आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी शरद पवार हे स्वतः हा रिगण्यात उतरत असल्याची चर्चा आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments