
Women Steals Jewellery Meant For Sisters Wedding: कर्ज फेडण्यासाठी आईच्या घरातून चोरी करणाऱ्या महिलेला द्वारका जिल्हा पोलिसांनी अटक केली. श्वेता (वय, ३१) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी महिलेने बुरखा घालून हा गुन्हा केला. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींची ओळख पटवली. पोलिसांनी महिलेच्या ताब्यातून सुमारे 13 लाख, साडेनऊ हजार रुपयांचे दागिने आणि बुरखा जप्त केला.








