मुधोजी हायस्कूलच्या १७ वर्षाखालील मुलींच्या हॉकी संघाचे दैदीप्यमान यश

0
35
मुधोजी हायस्कूलच्या १७ वर्षाखालील मुलींच्या हॉकी संघाचे दैदीप्यमान यश

फलटण प्रतिनिधी :- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने आयोजित अंतिम फेरीच्या स्पर्धेत मुधोजी हायस्कूलच्या १७ वर्षाखालील मुलींच्या हॉकी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला असून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे.

या अंतिम सामन्यात मुधोजी हायस्कूलच्या खेळाडूंनी संघभावना, शिस्तबद्ध खेळ आणि कौशल्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघावर मात केली. त्यांच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा परंपरेला नवा गौरव प्राप्त झाला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल मुधोजी हायस्कूलच्या विजेत्या संघाचे, सर्व खेळाडूंचे, प्रशिक्षक, कोच, पालकवर्ग तसेच हॉकीप्रेमी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातही अशाच प्रकारे उत्तुंग यश संपादन करून राज्य व राष्ट्रीय स्तरावर शाळेचे नाव उज्वल करावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.