The Song Of Scorpions : इरफान खानला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी; बाबीलने शेअर केला ट्रेलर!

0
70
The Song Of Scorpions : इरफान खानला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी; बाबीलने शेअर केला ट्रेलर!


दिवंगत अभिनेता इरफान खान याचा मुलगा बाबील खान याने या चित्रपटाची झलक सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. ‘द साँग ऑफ स्कॉर्पिअन’ या चित्रपटात इरफानने एका उंट व्यापाऱ्याची भूमिका केली आहे. इरफानने साकारलेला हा व्यापारी नूरन नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. नूरन एक स्वतंत्र मुलगी आहे आणि तिची आजी झुबेदा यांच्याकडून ‘साँग ऑफ स्कॉर्पिअन’ ही प्राचीन उपचार कला शिकत आहे. एका प्रचलित दंतकथेनुसार, जर एखाद्या विंचूने एखाद्याला दंश केला, तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. परंतु, या साँग ऑफ स्कॉर्पिअन गाऊन गायक त्या व्यक्तीला बरे करू शकतो.



Source link