
एखाद्या चित्रपटाबद्दल जितके वाद निर्माण होतात, तितकाच तो चित्रपट मोठा हिट ठरतो. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे शाहरुख खानचा चित्रपट ‘पठान’. शाहरुख खानच्या या चित्रपटाच्या वेळी सोशल मीडियावरील युजर्सनी ‘बॉयकॉट पठान’ हा हॅशटॅगही ट्रेंड केला होता. याशिवाय ठिकठिकाणी दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानचे पुतळेही जाळण्यात आले होते. पण, याचे परिणाम सर्वांसमोर आहेत. अशा स्थितीत ‘द केरळ स्टोरी’लाही या वादांचा फायदा मिळू शकतो, असे म्हटले जात आहे.