
फलटण प्रतिनिधी :- १९९५ च्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्राच्या अपक्ष आमदारांनी पाठिंब्या च्या बदल्यात अजब मागणी केली होती. प्रत्येक अपक्ष उमेदवार च्या पाठिंब्या च्या बदल्यात वेगवेगळ्या अपेक्षा होत्या, कोणाला मंत्रीपद , कोणाला महामंडळ हवं होतं, या सर्वांना आश्वासन देई पर्यंत तत्कालीन मुख्यमंत्री कै.मा. मनोहर जोशी सर व उप मुख्यमंत्री कै . गोपीनाथ मुंडे यांची दमछाक झाली होती.
त्या अनुषंगाने निकाल लागला तेव्हा काॅगेस चे ८० , शिवसेना ७३, आणि भाजप ६५ आमदार निवडून आले होते . विलासराव देशमुख, छगन भुजबळ असे दिग्गजांचा पराभव झाला होता. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तब्बल ४५ अपक्ष निवडून आले होते .
मॅजिक फिगर साठी मा . शरदचंद्र पवार साहेब यांच्या सहित युतीची धावाधाव सुरू होती पण कै.मा.मुडे साहेब चलाख होते त्यांनी अगोदरच काही दहा आमदारांची मोट बांधली होती, आत्ता फक्त प्रश्न उरला होता पश्चिम महाराष्ट्रातील अपक्ष आमदारांचा त्यांची नेमकी डिमांड काय आहे हे लक्षात येत नव्हते चाचपणी सुरू झाली त्या वेळी रामराजे, हर्षवर्धन पाटील, शिवाजी राव नाईक , दिलीप सोपल, अजित घोरपडे कै.भाऊसाहेब गुदगे व इतर असे नवखे व तरुण आमदार होते यांतील काही मंडळी मा. पवार च्या छावणीतील होती बैठकांचे सूर व जोर वाढू लागले त्यात काही मंत्री पदे व महामंडळ अध्यक्ष डील सुरू होत होत कृष्णा खोरे सिंचन विकास ही योजना पुढे सरकू लागली.
कृष्णा नदी प. महाराष्ट्राची जीवनदायिनी समजली जाते तिचं खोरे सोडलं तर बर्या पैकी राज्यभर दुष्काळी परिस्थिती होती कृष्णेचे बरचसं पाणी वाहून कर्नाटक आंध्र मार्गे समुद्राला जाऊन मिळते म्हणूनच गेली अनेक वर्षे कृष्णेचे पाणी अडवण्याचे प्रयत्न व मागणी सातत्याने सुरू होती, याबाबत तंटा लवाद सुरू होता, विधानसभेत सुद्धा यावरून चर्चासत्र सुरू होती मात्र ठोस उपाययोजना होत नव्हती.
मात्र या वेळी विधानसभेच्या त्रिशंकू अवस्थेचा फायदा उचलायचा हे अचूक खेळी रामराजे व काही आमदारांच्या डोक्यात आली व त्यांचे नेतृत्व पाणी प्रश्नावरील व्यवस्थापन व भू- गर्भ शास्त्राचे अभ्यासू श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कडे सुपुर्द केले गेले हा इतिहास आहे . “ सर्वात प्रथम कृष्णा खोरे मधील सर्व सिंचन प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे आश्वासन द्यावे मगच पाठिंबा व पाच वर्षांत सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करावेत, राज्यांची आर्थिक स्थिती पाहता एवढा निधी उभा करणे सोपे नव्हते त्यासाठी महामंडळ स्थापन करून बाजारातून निधी उभा करावयाचा ठरलं व २५ जानेवारी १९९६ रोजी कृष्णा खोरे विकास महामंडळ अस्तित्त्वात आले मात्र रामराजे यांनी दुसरं कोणतंही मंत्रीपद न घेता महाराष्ट्र राज्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी व कृष्णा खोरे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जबाबदारी व खबरदारी घेत फलटण च्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपाध्यक्षपदासाठी मागणी केली .
पाणीप्रश्नी रामराजे यांची दूरदृष्टी व कार्याची नोंद आजमितीस इतिहासात कायम राहील.
महाराष्ट्र राज्याच्या पाणीप्रश्नी रामराजे यांचे योगदान आणि त्याचा एकूण कृषी ,अन्न , नागरी सुविधा व अर्थकारणावर झालेला सकारात्मक परिणाम हा खरं तर स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. कामाच्या निवडलेल्या क्षेत्रात गुणात्मक बदल व मूल्यात्मक वाढ, हे त्यांच्या सार्वजनिक व्यवहारचे वैशिष्ट्य राहिले आहे. जे करायचे ते जाणतेपणाने आणि झपाटल्यासारखे करायचे, लोकशाहीच्या चौकटीत राहून लोकहिताचे निर्णय घेवयाचे, धर्मनिरपेक्ष मूल्यांची जपणूक करावयाची, जुन्या -नव्याचे मेळ घालायचे, अभ्यासक- विचारवंत यांच्याशी नाळ जुळवून ठेवायची,हे रामराजे सातत्याने जपत आलेत, कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करताना एखादा विद्यार्थीसारखे कुतुहल जागृत ठेवून वाटचाल करीत राहणं, लहान थोर असा भेद न मानता प्रसंगावधान राखत त्या क्षेत्रातील जाणकाराला फोन करून आपल्याला पडलेल्या प्रश्नांचे, शंकांचे निरसन तेव्हाच्या तेव्हा करून घेणे, स्वताला त्या क्षेत्रांशी अद्ययावत ठेवणे आणि अभ्यासकाला लाजवेल असे निष्कर्ष व संदर्भ देत राहणे .
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी समाजाच्या व्यापक व चिरंतन विकासाच्या वाटचालीसाठी दिलेले योगदान पुढील पिढीपर्यंत घेऊन जाणारया आणि खरया अर्थाने सुसंस्कृत असलेला ऐतिहासिक वारसा व सांस्कृतिक विचार कार्य रुपाने पुढे नेणारया प्रत्येक कार्यकर्त्याला नेहमीच ताकद देण्यासाठी संवेदनशील राहिले असल्याचे अनेकदा सकृतदर्शनी दिसून आले आहे , अपवाद काही राजकीय निर्णय व राजकीय डावपेचांचे खेळ अंगलट आले मात्र त्याला न जुमानता व न डगमगता त्याला सामोरे गेले मात्र मागे फिरले नाहीत म्हणून तर आज सुध्दा श्रीमंत रामराजे यांची दूरदृष्टीची पाॅवर व राफेल विमानाच्या गतीने प्रमाणे राजकीय प्रवास चांदया पासून ते बाद्या पर्यंत चालू आहे .
श्रीमंत रामराजे यांची सार्वत्रिक ओळख ही राजकारणी असली तरी त्यांनी केवळ राजकारणापुरते स्वताला कधीच बंदिस्त ठेवले नाही.
राजकीय -सामाजिक -सांस्कृतिक- आर्थिक – क्रिडा – आरोग्य -कृषी -ग्रामीण व शहरी विकास – दुष्काळ मुक्ती करता केलेले योगदान व पाणी प्रश्नावरील व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र राज्य बरोबर प. महाराष्ट्र व आपली कर्मभूमी फलटण लोणंद खडाळा व माळशिरस करता विकासात्मक दूरदृष्टी आणि सकारात्मक हस्तक्षेप या भूमिकेतून लीलया वावरत राहिले. समाजाच्या दैनंदिन जीवनाला भिडणारया सर्वच कळीच्या मुद्यांयाना श्रीमंत रामराजे च्या सार्वजनिक जीवनाने स्पर्श केला आहे. राजकारण हे केवळ निवडणुक, मते मिळवण्यापुरतेच मर्यादित राहत नाही, तर राजकारणावर ज्या ज्या क्षेत्राचा प्रभाव पडत असतो त्या सर्व क्षेत्राप्रति असलेली आत्मीयता व व्यापक विकासासाठीची धडपड म्हणजे राजकारण, हे श्रीमंत रामराजे च्या आजपर्यंतच्या कृतीतून आपल्याला दिसून येईल. त्यामुळेच, श्रीमंत रामराजे कोणतेही क्षेत्र वर्ज्य राहिले नाही आणि राजकारण बाजूला ठेवले तर सर्व पक्षीय नेत्यांनाही आजमितीस रामराजे कधी वर्ज्य वाटले नाहीत .
श्रीमंत रामराजे यांचे जाणतेपण व अन् झपाटलेपण हे खूपच आव्हानात्मक आहे.अनेक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. श्रीमंत रामराजे यांनी ज्या विषयात लक्ष घातले, जे काम केले, ते त्या क्षेत्राला कलाटणी देणारे ठरले आहे.
श्रीमंत रामराजे हे खूप संयमी नेतृत्व म्हणून नावलौकिक मिळविला आहे.
सार्वजनिक जीवनातील राजकारण हे क्षेत्र असे आहे, जिथे जनतेचा थेट संपर्क येत असतो. त्यामुळे या क्षेत्रात वावरणारी व्यक्ती ही संयमी असायला हवी अशी एक अपेक्षा असते. त्यांचा संयम राजकीय संस्कृतीला मिळालेले वरदान आहे. त्यांच्यावर आजवर जितके आरोप प्रत्यारोप झाले त्यातील एक ही आरोप सिद्ध होवू शकला नाही, त्यावर सवंग चर्चा होताना दिसते मात्र या सर्वांमधून जे श्रीमंत रामराजे वर मनापासून प्रेम करतात, त्याची अशी स्पष्ट भावना झाली आहे की काहीही आरोप होऊ देत, ते यातून सहीसलामत बाहेर सुटतात हा सर्व सामान्य लोक रामराजे वर दाखवत असलेला विश्वास आहे, अर्थात महाराजांन सारखे वागणे प्रत्येकालाच जमेलच असं नाही.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे महाराष्ट्र राज्याच्या व प. महाराष्ट्र पाणीप्रश्न , दुष्काळी परिस्थितीत झालेले अमूल्य बदल व दिलेले योगदान पूर्णपणे बाहेर आलेले नाही. महाराज साहेबांनी त्यांच्या उमेदीच्या कार्यकाळात केलेल्या कामांचे काही साक्षीदार आजही गावोगावी आहेत. परंतु तिथपर्यंत मुख्य माध्यमे पोहचली नाहीत, त्यांच्याच जवळपासचे नेते, कार्यकर्ते व स्थानिक पातळीवरील कार्यकर्तेनी सुध्दा ते प्रकर्षाने बाहेर आणण्याचे काम केले नाही. त्यामुळे *त्या गावात, तालुक्यात, जिल्हात ** रामराजेनी दिलेल्या योगदानाबद्दल आजची* पिढी अनभिज्ञ राहिली आहे.
श्रीमंत रामराजे यांच्या व्यापक भूमिका आणि व्यवस्थापनाचे रुप पाहता रामराजे हि एक व्यक्ती वाटत नाही तर ती सहजासहजी न उलगडणारी अशी एक संस्था आहे.
सर्व सामान्य मानवी शक्यता ओलांडून संवेदनशील मानवी पटलावर अथांग सागरासारखे गारुड उभा केलेली ही हाडामासाची व्यक्ती विविधांगानी समजून घेणे, हि आजच्या पिढीसाठी अत्यावश्यक आहे.कारण उद्याच्या वर्तमानातील प्रवासाला जेव्हा अडचणी येतील तेव्हा सार्वजनिक जीवनातील ३५ वर्षाचा संकल्प व संघर्षाचा काळ इतिहास लाभलेली ही रामराजे नावाची संस्थात्मक ठेव निश्चितच उभारी देईल .
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आपल्याकरता Strategy corporation आहे.
माझा कचरा माझी जबाबदारी… हरित फलटण…मी फलटण कर.. नंदकुमार मोरे ( फलटण)*








