गुरु द्रोणा अकॅडमीतील मारहाण प्रकरण गाजतंय! प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

0
6
गुरु द्रोणा अकॅडमीतील मारहाण प्रकरण गाजतंय! प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

फलटण साहस Times :- फलटण शहरात खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण नसल्यामुळे गंभीर प्रकार घडू लागले आहेत. शहरातील गुरु द्रोणा अकॅडमीमध्ये एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा कामगार संघर्ष संघटनेने तीव्र निषेध करत दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर संघटनेचे अध्यक्ष सनी घनश्याम काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून फलटणमधील खासगी अकॅडम्यांविरोधात प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर व गटशिक्षणाधिकारी अनिल सपकाळ यांनी कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप आहे. या निष्क्रियतेमुळेच अशा प्रकारचा गंभीर अनर्थ घडल्याचे कामगार संघटनेचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक शोषणाचे आरोप लावले जात असलेल्या गुरु द्रोणा अकॅडमीने शाळांतील अभ्यासक्रम शिकवून पालकांची दिशाभूल व फसवणूक केल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेने आगामी ०४ ऑगस्ट, सोमवार रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण पुकारले असून, दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कामगार संघर्ष संघटनेच्या वतीने शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा मानसिक व आर्थिक शोषण करणाऱ्या संस्थांपासून दूर राहावे.