फलटण नगरपालिकेत परिवर्तनाची चाहूल – कामगार संघर्ष संघटना निवडणुकीच्या रिंगणात !

0
22
फलटण नगरपालिकेत परिवर्तनाची चाहूल – कामगार संघर्ष संघटना निवडणुकीच्या रिंगणात !

फलटण, : कामगार संघर्ष संघटना ही नेहमी सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी ठाम उभी राहणारी संघटना आहे. शिक्षण, रोजगार, आरोग्य, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा जनतेला मिळाव्यात यासाठी संघटनेचे पदाधिकारी रात्रंदिवस अहोरात्र झटत आहेत.

आता 2025/26 च्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कामगार संघर्ष संघटना विविध पक्षांसोबत युती करून ताकदीने रिंगणात उतरणार आहे. फलटण नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 1, 2, 3, 5, 7 आणि 10 या भागांमध्ये आमचे उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत.

सातारा जिल्हा युथ अध्यक्ष सुरजभाऊ भैलुमे यांनी हा निर्णय जाहीर करताना सांगितले की,

ही संधी आहे सत्तेत जाऊन समाजाच्या हितासाठी थेट लढण्याची. मतदार मायबापांनी आजवर आम्हाला भरभरून साथ दिली, आणि याहीवेळी तुमचा विश्वासच आमची ऊर्जा असेल.

या निवडणुकीत कामगार संघर्ष संघटना एक मजबूत, पारदर्शक आणि लोकहितवादी प्रशासन उभं करण्याचा निर्धार घेऊन उतरते आहे.

     जाहीर आवाहन:

“मतदार दात्यांनो, तुमची साथ हवी आहे. परिवर्तनाची सुरुवात तुमच्या मताने होईल!”

✍️ – सुरजभाऊ भैलुमे

सातारा जिल्हा युथ अध्यक्ष
कामगार संघर्ष संघटना