फलटण (साहस Times ): भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने वर्षवास प्रवचन मालिकेचे चौथे पुष्प ढवळ या गावी गुंफण्यात आले. यावेळी अनित्यवाद, अनात्मवाद आणि दुःख या विषयावर मार्गदर्शन करताना भारतीय बौद्ध महासभेचे प्रवचनकार म्हणाले की,मनाचं मांगल्या, बुद्धीची कसोटी आणि विज्ञान हेच बुद्ध धम्माचे मूलतत्त्व असून सर्वप्रथम चार आर्य सत्य सांगितली ज्यामध्ये पहिलंच आर्य सत्य दुःख आहे. पण भगवान बुद्धांनी दुःख निवारण्याचा मार्ग म्हणजेच आर्य अष्टांग मार्गही सांगितला. भगवान बुद्धांनी अनात्मवादाचा सिद्धांत सांगितला. भगवान बुद्धांनी आपल्या उद्देशांमध्ये आत्मा नावाची कोणतीही वस्तू नसल्याचे स्पष्ट सांगितले असून त्यांनी मनाला सहावे इंद्रिय मानले आहे. कारण कोणत्याही कुशल कुशल कर्माचे उगम स्थान मन आहे. म्हणून त्या मनामध्ये मांगल्य, प्रेम,मंगल मैत्रीची भावना निर्माण करणं हेच भगवान बुद्धाच्या धम्माचा सार आहे. जगात कोणतीही गोष्ट हे अंतिम नसून ती परिवर्तनीय आहे.अनित्य आहे. क्षणा – क्षणाला त्यामध्ये बदल होत असतो.तेव्हा या वर्षावासाच्या कालावधीमध्ये व पुढील आयुष्यात आपण मनाचे मांगल्य, बुद्धीची कसोटी, आणि विज्ञान या तीन तत्त्वाचा अंगीकार करून आपले जीवन बुद्ध,धम्म आणि संघ बलाने सुखकर बनवावे असे प्रतिपादन सोमीनाथ घोरपडे यांनी मौजे ढवळ येथे वर्षावास मालिकेतील चौथे पुष्प गुंपताना केले.
या कार्यक्रमाला केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु दादासाहेब भोसले, तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु महावीर भालेराव, महासचिव आयु बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष आयु विठ्ठल निकाळजे, प्रचार आणि पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु रामचंद्र मोरे, कार्यालयीन सचिव आयु चंद्रकांत मोहिते आणि ढवळ गावचे सुपुत्र आणि भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार सचिव आयु बजरंग गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच पंचशील मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते,बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे औचित्य साधून 13 एप्रिल 2025 रोजी घेण्यात आलेली ‘झटपट धम्म ज्ञान परिक्षा’ या परिक्षेसाठी ढवळ गावातुन 22 विद्यार्थी बसले होतो.त्यांना भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रत देखील देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु बजरंग गायकवाड यांनी केले.शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.