
फलटण | प्रतिनिधी :- श्री संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी, फलटण यांच्या वतीने श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती सोहळा रविवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी फलटण येथे भक्तिभाव व सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.
“मन चंगा तो काटौती में गंगा” या संतवचनाची प्रेरणा घेऊन आयोजित या जयंती सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांची सुरुवात सकाळी १०.०० ते १०.३० या वेळेत हळदी-कुंकू समारंभाने होणार आहे. त्यानंतर १०.३० ते ११.३० या वेळेत श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती सोहळा संपन्न होणार आहे.
यानंतर ११.३० ते १२.३० या वेळेत श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज गौरव पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मा. प.पू. श्री महंत सुंदरगिरीजी महाराज (१०८), मठाधिपती श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, तीर्थक्षेत्र पुसेगाव यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. आमदार दिपकरावजी चव्हाण (फलटण–कोरेगाव विधानसभा मतदारसंघ) भूषविणार आहेत.
या सोहळ्यास मा. श्री संजय तात्याबा सोनवणे (सहाय्यक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका), मा. श्री सजन विठोबा हंकारे (सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी., सातारा) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मा. श्री गणपतराव भोसले, मा. श्री ज्ञानेश्वर भगत (उपसंचालक, कामगार विमा, मुंबई), मा. डॉ. सुभाष विष्णू जाधव, मा. श्री शशीकांत भोसले, जादुगार शिवम (वडगाव निंबाळकर), मा. श्री श्रीकांत साळुंखे सर (संचालक, श्री क्लासेस फलटण), मा. श्री संतोष चव्हाण (सरपंच, कोरेगाव कुमठे), मा. श्री बापुराव जगताप (संपादक व पत्रकार, साप्ताहिक राम आदेश), मा. श्री किरण गोळे (पत्रकार, दै. तरुण भारत) तसेच मा. अॅड. श्री प्रतिक भारत देशमाने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमानंतर दुपारी १.०० ते २.०० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ, फलटण येथे होणार आहे.
या जयंती सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष श्री भोलेनाथ भोईटे, सचिव श्री हृदयनाथ भोईटे, उपाध्यक्ष श्री रोहिदास पवार व श्री अरुण खरात, तसेच सहसचिव श्री कृष्णात बोबडे यांनी केले आहे.






