
सगळ्यांनाच सायलीमध्ये प्रतिमाची झलक पाहायला मिळत आहे. सायलीच्या प्रेमळ वागण्याने आता सगळ्यांना पावलोपावली प्रतिमाची आठवण येऊ लागली आहे. प्रत्येकालाच असे वाटत आहे की, सायली हिच प्रतिमाची मुलगी आहे. मात्र, सध्या प्रिया तन्वी म्हणजेच प्रतिमाची मुलगी बनून तिच्या घरात वावरत आहे. मात्र, आता तिचा खोटेपणा लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे. एकीकडे प्रियाची साथीदार अर्थात सायलीची नणंद तिला ती तन्वी वाटत नाही, असा टोमणा देणार आहे.







