
मुख्य आरोपी सुनिजर वर्मा आणि त्याचा मित्र रमेश वर्मा यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला भिवंडी येथील अंजुरफाटा भागात राहायला होती. मृत महिला विवाहित असतानाही तिचे सुनिजरसोबत अनैतिक संबंध होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांच्यात काही कारणास्तव भांडण झाले. यानंतर महिलेने सुनिजरसोबत अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या सुनिजरने तिचा कायमचा काटा काढण्याचा ठरवले.





