Tesla Employee Attacked By a Robot | जी भीती होती ते अखेर घडलेच! आधी खाली पाडले आणि नंतर रक्तस्त्राव… ; रोबोटचा टेस्ला कर्मचाऱ्यावर हल्ला | Navarashtra (नवराष्ट्र)

0
13
Tesla Employee Attacked By a Robot | जी भीती होती ते अखेर घडलेच! आधी खाली पाडले आणि नंतर रक्तस्त्राव… ; रोबोटचा टेस्ला कर्मचाऱ्यावर हल्ला | Navarashtra (नवराष्ट्र)


जी भीती होती ते अखेर घडलेच! आधी खाली पाडले आणि नंतर रक्तस्त्राव… ;  रोबोटचा टेस्ला कर्मचाऱ्यावर हल्ला

अनेक हॉलिवूड साय-फाय चित्रपटांमध्ये रोबोटला खलनायक दाखवण्यात आले आहे. या चित्रपटांमध्ये रोबोट संपूर्ण जगाचा ताबा घेतात. मग मानव जातीला वाचवण्यासाठी काही शूर लोक त्यांच्याशी लढतात आणि जगाला वाचवतात. चित्रपटात हे सगळं बघून खूप छान वाटतं.

अनेक हॉलिवूड साय-फाय चित्रपटांमध्ये रोबोटला खलनायक दाखवण्यात आले आहे. या चित्रपटांमध्ये रोबोट संपूर्ण जगाचा ताबा घेतात. मग मानव जातीला वाचवण्यासाठी काही शूर लोक त्यांच्याशी लढतात आणि जगाला वाचवतात. चित्रपटात हे सगळं बघून खूप छान वाटतं. पण, असे काही कोणा बाबतीत प्रत्यक्षात घडले तर? एक रोबोट तुमच्यावर हल्ला करतो. ते तुम्हाला मारहाण करतात आणि तुम्हाला रक्तबंबाळ देखील करतात. हे खरोखरच घडले आहे. तेही प्रख्यात ई-कार निर्माता टेस्लाच्या कारखान्यात! टेस्लाच्या एका कर्मचाऱ्यावर रोबोटने हल्ला केला आणि त्याचे रक्त वाहू लागले. कंपनी दोन वर्षांपासून ही घटना दाबण्याचा प्रयत्न करत होती.

टेस्ला सॉफ्टवेअर इंजिनिअरवर रोबोटचा हल्ला
टेस्लाच्या एका सॉफ्टवेअर इंजिनीअरसोबत हा अपघात झाला. हा अपघात २०२१ मध्ये झाला होता. पण, ही माहिती नुकतीच समोर आली आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, हा अभियंता ऑस्टिन, टेक्सास येथील टेस्लाच्या कारखान्यात काम करत होता. दरम्यान, एका बिघडलेल्या रोबोटने त्याच्यावर हल्ला केला. एका प्रत्यक्षदर्शीने इमर्जन्सी स्टॉप बटण दाबले आणि त्याचा जीव वाचला.






Source link