
कंगना रनौतचा आगामी चित्रपट ‘तेजस’ याआधी २० ऑक्टोबरला रिलीज होणार होता. पण, टायगर श्रॉफच्या ‘गणपत’सोबत बॉक्स ऑफिसवर होणारी टक्कर पाहता, चित्रपट निर्मात्यांनी ‘तेजस’चे प्रदर्शन एका आठवड्याने पुढे ढकलले आहे. आता हा चित्रपट २७ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पहिल्यानंतर आता चाहते या चित्रपटासाठी आतुर झाले आहेत.






