फलटण :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील रविवारी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली आहे.
प्रशासनाकडून फलटण शहर व पंचक्रोशीतील नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे की, लोकसभा सार्वत्रीक निवडणुक २०२४ च्या अनुशंगाने दिनांक ०७/०५/२०२४ रोजी मतदान प्रकिया राबविणेत येत असलेने त्यानुशंगाने फलटण शहरामध्ये एकूण ४४ मतदान केंद्र आहेत, तसेच फलटण शहरामध्ये रविवार दिनांक ०५/०५/२०२४ रोजी संपुर्ण दिवसभर विविध पक्षाच्या सभा व रॅलीचे आयोजन करणेत आलेले आहे. त्यामुळे सदर दिवशी फलटण शहरात गर्दी होण्याची शक्यता नाकरता येत नाही, या करिता शहरातील कायदा व व्यवस्था राखणे कामी रविवार दिनांक ०५/०५/२०२४ रोजी होणारा आठवडी बाजार रद्द करणेत येत आहे. याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे अशी आवाहन तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव करण्यात आली आहे.