सुविधेच्या शाळेसाठी’ शिक्षकांचा बनवेगिरीचा खेळ; पुण्यनगरीच्या बातमीने फोडला !

0
11
सुविधेच्या शाळेसाठी’ शिक्षकांचा बनवेगिरीचा खेळ; पुण्यनगरीच्या बातमीने फोडला !

सातारा :-  सातारा जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये मोठा घोटाळा उघड झाला आहे. संवर्ग एकमधून जवळची शाळा मिळावी, यासाठी काही प्राथमिक शिक्षकांनी बोगस दिव्यांग किंवा दुर्धर आजाराचे दाखले सादर करत प्रशासकीय यंत्रणेला गंडवण्याचा प्रयत्न केला.

या प्रकाराची गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने सिव्हिल हॉस्पिटल येथे फेरतपासणी मोहीम सुरू केली असून आतापर्यंत २७० शिक्षक व नातेवाईकांची तपासणी झाली असून त्यात तब्बल ४४ शिक्षक अपात्र ठरले आहेत.

त्यात विशेष म्हणजे २१ शिक्षकांनी फेरतपासणीपासून धूम ठोकली आहे. अशा गैरहजर राहणाऱ्यांविरुद्ध शिक्षण विभागाने कारवाई सुरू केली असून, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांच्या आदेशानुसार निलंबनपूर्व नोटिसा पाठवल्या गेल्या आहेत.


🟠 ‘दुर्गम नको, तर हवी सोयीची शाळा!’

महाबळेश्वर व जावलीसारख्या दुर्गम तालुक्यांतील शाळांमध्ये न जावं लागावं, यासाठी काही शिक्षकांनी आरोग्य यंत्रणेचा वापर करत खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचं स्पष्ट झालं आहे. यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व सीईओ यशनी नागराजन यांनी तातडीने हालचाली करत फेरतपासणीचे आदेश दिले.


🔴 संवर्ग दोनमधील ‘दाखला घोटाळा’ही समोर

दैनिक पुण्यनगरीच्या दुसऱ्या वृत्तानुसार, संवर्ग दोनमधील काही शिक्षकांनी खोटे अंतराचे दाखले देऊन बदली घेतल्याचे उघड झाले आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम विभागातील दोषींवर लवकरच चौकशी होणार आहे.


🟢 ४० शिक्षक पात्र; मात्र ८ अपात्र, तर काहींनी पाठ फिरवली!

फेरतपासणीच्या चौथ्या टप्प्यात ५५ शिक्षक व नातेवाईकांना वेळापत्रक दिलं गेलं होतं. त्यात ४९ जणांची तपासणी झाली असून ४० शिक्षक पात्र ठरले. ८ शिक्षक अपात्र, तर ६ शिक्षकांनी तपासणीकडे पाठ फिरवली.


📢 “बँड लावून वाजतगाजत आणायचं का त्यांना? शिक्षण विभाग काही खासगी मालमत्ता नाही!”

फेरतपासणीपासून पळणाऱ्या शिक्षकांविरोधात संताप व्यक्त होत असून, त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.