Monday, September 14, 2026
Homeसाताराशिक्षक दिन साजरा: माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व गावातील...

शिक्षक दिन साजरा: माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व गावातील निवृत्त शिक्षकांचा सन्मान

फलटणः जिल्हा परिषद शाळा, निरगुडी येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात गावातील निवृत्त शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

गावातील प्रतिष्ठित निवृत्त शिक्षक श्री. विजयकुमार पांडुरंग झांजुर्णे, श्री. वसंत श्रीपती सस्ते, श्री. व्यंकटराव भिवा सस्ते, श्री. दशरथ नामदेव सस्ते, श्री. बाळकृष्ण नामदेव फाळके, तसेच श्रीमती रेखा केशव तावरे यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. भिसे गुरुजी, श्री. सुतार सर, श्री. चांगण सर, सौ. कदम मॅडम, सौ. चिंचकर मॅडम, अंगणवाडी शिक्षिका, हायस्कूल शिक्षिका यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक भिसे गुरुजी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. निवृत्त शिक्षक श्री. व्यंकटराव भिवा सस्ते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि शालेय जीवनातील आदर्शांचे महत्व पटवून दिले.

या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य श्री. सत्यजित दशरथ सस्ते यांची शालेय व्यवस्थापन समितीमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या उत्सवात गावातील प्रमुख व्यक्ती श्री. चंद्रकांत सस्ते, श्री. बाळासो भगवन सस्ते, श्री. संतोष सस्ते, श्री. विठ्ठल सस्ते, श्री. शाहूराज सस्ते, श्री. वामन जाधव, श्री. राजेंद्र लकडे, श्री. धनाजी लकडे, श्री. राहुल सस्ते, श्री. रामचंद्र चव्हाण, श्री. प्रशांत सस्ते, श्री. विकास इथापे, श्री. निलेश गोरे, श्री. महेश सस्ते, श्री. अभिजित सस्ते, श्री. विकास सस्ते तसेच पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments