
तारे जमीन पर
आमिर खान आणि दर्शिल सफारी अभिनीत ‘तारे जमीन पर’ हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात डिस्लेक्सिया असणारी मुले आणि त्यांचे पालक या स्थितीचा कसा सामना करतात यावर भाष्य केले गेले आहे. हा चित्रपट चिमुकल्या ईशानची कथा आहे, ज्याला शाळेतील खराब कामगिरीनंतर बळजबरीने एका बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले जाते. मात्र, इथे आल्यानंतर त्याचे शिक्षक त्याला अशा पद्धतीने शिकवतात की, सगळ्यांनाच त्याचा गर्व वाटू लागतो.








