
सध्या स्टारकिड्स हे चर्चेत आहेत. काहींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे तर काही स्टारकिड्स बाहेर फिरताना दिसत आहेत. छोट्या स्टारकिड्समधील तैमुर, जहांगिर, मालती, देवी, समिशा आणि इतरांचे क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सैफ अली खान आणि करीना कपूरचा मुलगा तैमुर तर सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. तैमुर विषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. चला जाणून घेऊया तैमुर कोणत्या शाळेत शिक्षण घेतोय आणि त्याची फी किती आहे.







