
गेल्या काही दिवसांपासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेच्या निर्मात्यांवर अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने गंभीर आरोप केल्याचे प्रकरण सुरु आहे. असित मोदींनी लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप जेनिफरने लावला आहे. तसेच सेटवरील वातावरण कसे असते हे देखील तिने सांगितले होते. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे. दरम्यान, असित मोदीने पुन्हा एकदा या प्रकरणातील साक्षीदाराने जबाब बदलावा यासाठी प्रयत्न केले असा आरोप केला आहे.






