
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. यामधील प्रत्येक पात्राचं प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान आहे. मात्र, गेली ६ वर्ष या मालिकेचे चाहते एका खास व्यक्तीची वाट बघत आहेत. जेठालालची पत्नी अर्थात दयाबेन मालिकेत कधी परतणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. आता निर्मात्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.






