Swatantrya Veer Savarkar Review : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात नेमकं काय? बघण्याआधी रिव्ह्यू वाचाच!

0
16
Swatantrya Veer Savarkar Review : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात नेमकं काय? बघण्याआधी रिव्ह्यू वाचाच!


काय आहे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची कथा?

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्याचा आढावा घेणाऱ्या या चित्रपटाची कथा विनायक दामोदर सावरकर यांच्या बालपणापासून सुरू होते. लहानपणीच मातृछत्र हरपलेल्या विनायक दामोदर सावरकर यांना तरुणपणात आपल्या वडिलांना देखील गमवावे लागते. एका महामारीमुळे त्यांच्या वडिलांचा मृत्यू होतो. मात्र, मृत्यूपूर्वी त्यांचे वडील आपल्या मुलाला ‘क्रांतिकारक बनवू नकोस. इंग्रज फार मोठे आहेत, आपण त्यांच्याशी लढू शकत नाही. तेव्हा तू यातून बाहेर पड’, असे समजावून सांगत असतात. मात्र, विनायक दामोदर सावरकर यांनी आपण क्रांतिकारक व्हायचंच हे मनाशी ठरवलेलं असतं. ब्रिटिशांना थांगपत्ताही लागू न देता सावरकरांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये अभिनव भारत सोसायटीची सुरुवात केली होती. आपल्या भावाला त्याच्या प्रत्येक क्रांतीकारी पावलावर साथ देण्यासाठी थोरले बंधू गणेश सावरकर देखील खंबीरपणे उभे राहिले. आपल्या भावाला लंडनमध्ये जाऊन शिकता यावे, यासाठी गणेश सावरकर यांनी असे सासर निवडले, जे यासाठी आर्थिक मदत करू शकतील. या चित्रपटात विनायक दामोदर सावरकर यांच्या एकूण आयुष्याचा आढावा घेण्यात आला आहे. परदेशात शिक्षण, मग तुरुंग ते काळ्यापाण्याची शिक्षा, शेवटी अनेक वर्षांनंतर विनायक दामोदर सावरकरांची घरवापसी या सगळ्या घटना चित्रपटात पाहायला मिळत आहेत. मात्र, या दरम्यान नेमकं काय काय घडतं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.



Source link