Suryakumar Yadav Equals World Record Becomes 1st Indian Player with Most Consecutive 25+ Scores in T20 Cricket MI vs DC IPL 2025

0
9
Suryakumar Yadav Equals World Record Becomes 1st Indian Player with Most Consecutive 25+ Scores in T20 Cricket MI vs DC IPL 2025


Suryakumar Yadav Equals World Record in T20I Cricket: सूर्यकुमार यादव यंदा आयपीएल २०२५ मध्ये वादळी फॉर्मात आहे. तर ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही सूर्यादादा आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या प्लेऑफसाठी महत्त्वाच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला १८० धावांचा टप्पा गाठण्यात मोलाची भूमिका बजावली. या खेळीसह सूर्यादादाने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

सूर्यकुमार यादवने यंदाच्या मोसमात भले ही शतकी खेळी केलेली नाही. पण अर्धशतकी आणि छोट्या खेळींच्या जोरावर सूर्यादादाने आपला फॉर्म दाखवत विश्वविक्रमी कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादव वानखेडेच्या मैदानावर संथ फलंदाजी करत मैदानावर टिकून होता. त्याने सावध खेळी खेळत अखेरच्या षटकापर्यंत सामना नेला. जिथे मुंबई १८व्या षटकात १३२ धावांवर होती. तिथे नमन धीरने १९व्या षटकात २७ धावा केल्या आणि सूर्याने अखेरच्या षटकात फटकेबाजी करत १८० धावांचा टप्पा गाठला.

सूर्यकुमार यादवने यंदाच्या मोसमात त्याच्या सर्व खेळींमध्ये २५ अधिक धावा केल्या आहेत. आतापर्यंत टी-२० क्रिकेटच्या इतिहासात, टेम्बा बावुमा हा एकमेव फलंदाज आहे ज्याने सलग १३ डावांमध्ये २५ पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने २०१९ ते २०२० दरम्यान हा पराक्रम केला होता, पण आता एकाच वर्षात २०२५ मध्ये सलग १३ वेळा २५ अधिक धावा करण्याचा विक्रम सूर्यकुमार यादवने करत त्याची बरोबरी केली आहे.

हेही वाचा

सूर्या एका वर्षात सर्वाधिक वेळा सलग २५ धावांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. सूर्यकुमार यादवने या वर्षी आयपीएलमध्ये खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये किमान २५ धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा आणि भारतातील पहिला फलंदाज ठरला आहे. ब्रॅड हॉज, जॅक रुडॉल्फ, कुमार संगकारा, ख्रिस लिन आणि काइल मेयर्स यांनी आतापर्यंत ११ वेळा ही कामगिरी करून दाखवली आहे.

हेही वाचा
हेही वाचा

सर्वाधिक वेळा २५ अधिक धावा करणारे टी-२० क्रिकेटमधील फलंदाज

१३ वेळा टेम्बा बावुमा (२०१९-२०)
१३ – सूर्यकुमार यादव (२०२५)
११ – ब्रॅड हॉज (२००५-०७)
११ – जॅक रुडोल्फ (२०१४-१५)
११ – कुमार संगकारा (२०१५)
११ – ख्रिस लिन (२०२३-२४)
११ – काइल मेयर्स (२०२४)

सर्वाधिक वेळा २५ अधिक धावा एका आयपीएल मोसमात करणारे फलंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१३ डाव – केन विल्यमसन (सनराझर्स हैदराबाद, २०१८)
१३ डाव – शुभमन गिल (गुजरात टायटन्स, २०२३)
१३ डाव – सूर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स, २०२५)
१२ डाव – विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, २०१६)
१२ डाव – डेव्हिड वॉर्नर (सनराझर्स हैदराबाद, २०१६)





Source link