
शेवटच्या भेटीवेळी देवानंद यांनी सुरैया यांच्या घरी फोन केला होता. तो फोन सुरैया यांच्या आईने उचलला. सुरैयाच्या आईने त्यांना सांगितले की, सुरैयाला त्यांना भेटायचे होते आणि त्यांनाही भेटायचे असेल, तर दुसऱ्या दिवशी त्यांनी घराच्या छतावर वेळेत पोहोचावे. देवानंद यांना सुरैया यांना भेटायचे होते. मात्र, घराच्या टेरेसवर भेताचे हे ऐकून ते थोडेसे गांगरून गेले होते. त्यांना वाटले की, ‘हा मला अडकवण्याचा हा कट आहे का? मी पकडला गेलो तर? दुसऱ्या दिवशी ही बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध होईल. मला अटकही होऊ शकते.’ मात्र, सुरैया यांच्या आईवर विश्वास ठेवत देवानंद तिथे पोहोचले. पण, त्यांनी सोबतीला एका पोलीस असणाऱ्या मैत्रिणीला घेऊन गेले होते. या भेटीनंतर त्यांच्यातील नाते तिथेच संपले.






