
गेल्या वर्षी या मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला होता. मात्र, यंदा सुरेश गोपी यांनी त्रिशूरमध्ये काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाला धूळ चारली आहे. लोकसभेवर निवडून जाण्यापूर्वी सुरेश गोपी राज्यसभेचे खासदार राहिले आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नव्या मंत्रिमंडळात 71 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये केरळमधील भाजपचे एकमेव खासदार सुरेश गोपी (Suresh Gopi) यांचाही समावेश आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लागलीच अनेक चर्चा रंगू लागल्या. अनेक वृत्त माध्यमांवर त्यांना मंत्रिपद नको असल्याचे प्रसिद्ध झाले. परंतु, या वृत्तानंतर त्यांनी आता खुलासा केला आहे. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हटले आहे.
A few media platforms are spreading the incorrect news that I am going to resign from the Council of Ministers of the Modi Government. This is grossly incorrect. Under the leadership of PM @narendramodi Ji we are committed to the development and prosperity of Kerala ❤️ pic.twitter.com/HTmyCYY50H
— Suressh Gopi (@TheSureshGopi) June 10, 2024









