Supreme Court on Patanjali Ayurveda | ‘पतंजली’ला सुप्रिम कोर्टाचा दणका; या जाहिराती बंद करण्याचे आदेश | Navarashtra (नवराष्ट्र)

0
14
Supreme Court on Patanjali Ayurveda | ‘पतंजली’ला सुप्रिम कोर्टाचा दणका; या जाहिराती बंद करण्याचे आदेश | Navarashtra (नवराष्ट्र)


‘पतंजली’ला सुप्रिम कोर्टाचा दणका; या जाहिराती बंद करण्याचे आदेश

पतंजली आयुर्वेद कंपनीने चुकीच्या दाव्यासह जाहिराज प्रसिद्ध केल्यामुळे पतंजली कंपनीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद आणि तिचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आचार्य बाळकृष्ण यांना नोटीस बजावली आहे.

दिल्ली : कमी वेळामध्ये भारतीय बाजारामध्ये मोठा व्यवसाय उभा करणाऱ्या पतंजली कंपनीला सुप्रिम कोर्टाचा दणका बसला आहे. पतंजली आयुर्वेद कंपनीने चुकीच्या दाव्यासह जाहिराज प्रसिद्ध केल्यामुळे पतंजली कंपनीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद आणि तिचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आचार्य बाळकृष्ण यांना नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर त्यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाची कारवाई का सुरू करू नये अशी विचारणा केली आहे.

पंतजली आयुर्वेद कंपनीने 10 जुलै 2022 रोजी ‘द हिंदू’ या वृत्तपत्रात अर्ध्या पानावर औषधांबाबत जाहिरात दिली होती. यामध्ये “अ‍ॅलोपॅथीकडून होणारा अपप्रचार : स्वत:ला व देशाला फार्मा व मेडिकल क्षेत्रातून होणाऱ्या अपप्रचारापासून वाचवा”, असा मथळा देण्यात आला होता. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजली आयुर्वेद विरोधात याचिका दाखल केली. त्यात पतंजली आयुर्वेदकडून अ‍ॅलोपॅथी व आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतींबाबत अपप्रचार केला जात असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनकडून आरोप करण्यात आला. पतंजली आयुर्वेदकडून ड्रग्ज अँण्ड ऑदर मॅजिक रेमेडिज अ‍ॅक्ट, 1954 व ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे थेट उल्लंघन केले जात असल्याचे देखील इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सांगण्यात आले. तसेच करोना महामारीच्या वेळी बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांचा देखील उल्लेख रिट याचिकेत करण्यात आला होता.






Source link