
Sunny Deol Viral Video: बॉलिवूड विश्वात सध्या देओल कुटुंब चांगलाच कल्ला करत आहे. अभिनेता सनी देओलचा ‘गदर २’, धर्मेंद्र यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि बॉबी देओल याचा ‘अॅनिमल’ हे चित्रपट तुफान गाजले आहेत. एकीकडे देओल कुटुंब यशाचा आनंद साजरा करत असताना, आता सनी देओल याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सनी देओल रस्त्याच्या मधोमध चालताना दिसत आहे. त्याला स्वतःचा तोल देखील सावरत नसल्याने तो अचानक रिक्षेसमोर येतो. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी त्याला दारू पिण्यावरून सुनावलं आहे. यावर आता स्वतः सनी देओल याची प्रतिक्रिया आली आहे.








