
अभिनेता सुनील ग्रोव्हरचा जन्म १३ ऑगस्ट १९७७ रोजी हरियाणातील सिरसा जिल्ह्यात झाला. त्याने १९९८मध्ये अभिनेता अजय देवगनच्या ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. यानंतर तो २००२मध्ये ‘लिजेंड ऑफ भगत सिंह’ या चित्रपटात दिसला होता. मात्र, ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल शर्मा’मधून सुनील ग्रोव्हरला अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली.








