
एप्रिल महिन्याचे आगमन होताच देशभरात उन्हाळा सुरू झाला आहे. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सूर्य आग ओकत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे (Summer News) देशातील 11 राज्ये उष्णतेच्या लाटेत सापडली आहेत.
नवी दिल्ली : एप्रिल महिन्याचे आगमन होताच देशभरात उन्हाळा सुरू झाला आहे. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सूर्य आग ओकत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे (Summer News) देशातील 11 राज्ये उष्णतेच्या लाटेत सापडली आहेत. या 11 राज्यांतील 17 शहरांचे तापमान दुपारी 43 अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातील रायलसीमा, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, उत्तर मध्य प्रदेश, गंगा पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये 42 ते 44 अंशांच्या दरम्यान तापमानाची नोंद झाली. मध्य प्रदेशातील 19 शहरांमध्ये तापमान 40 अंशांपेक्षा जास्त आहे. राजधानी भोपाळमध्ये दुपारचे तापमान 39.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. याशिवाय गुजरात, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्येही तापमानात वाढ झाली आहे.









