
sukma naxal encounter : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत आतापर्यंत ३ ते ४ नक्षलवादी ठार झाले आहेत. सुकमाच्या गोगुंडा भागात ही चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे. गोळीबारात काही जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे. पोलिसांना या कारवाईत मोठे यश मिळाले आहे.





