
Subramanian Swamy on PM Modi : देशाच्या इतिहासात सर्वात मोठी ऐतिहासिक घटना म्हणेज २२ जानेवारीचा प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा असणार आहे. गेली अनेक दिवसांपासून हा विषय राजकीय चर्चेचा विषयदेखील ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच शंकराचार्यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून मोठे वक्तव्य केले होते. आता भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचे वक्तव्यानेदेखील खळबळ उडाली आहे. अशात भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेले एक वक्तव्य चर्चेत आहे. पत्नीशिवाय मोदी पूजा कशी काय करणार, या आशयची एक पोस्ट सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.
Since Modi without his wife cannot formally participate in six days of Prana Pratishtha Puja, and four of the revered
Scholars, the Shankaracharyas, will not be present on sixth day viz., Jan 22, I will instead participate on Sri Rama’s birthday prayers during Ram Navmi on April…— Subramanian Swamy (@Swamy39) January 16, 2024








