“शिवाजीराजे इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांची क्रीडा क्षेत्रात झळकदार कामगिरी; श्रेयश भोसलेची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड”

0
3
“शिवाजीराजे इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांची क्रीडा क्षेत्रात झळकदार कामगिरी; श्रेयश भोसलेची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड”

फलटण : श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करून शाळेचा मान उंचावला आहे. विशेष म्हणजे, श्रेयश भोसले याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून तो पुणे येथे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धेत झळकले यश

सातारा जिल्हा अॅमॅच्युअर अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे शाहू स्टेडियम येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत श्रेयश भोसलेने १६ वर्षांखालील गटातील गोळाफेकमध्ये सुवर्णपदक आणि भालाफेकमध्ये रौप्यपदक पटकावले. त्यामुळे त्याची २ सप्टेंबर रोजी बालेवाडी, पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तालुकास्तरीय कामगिरीत पदकांचा पाऊस

फलटण तालुका अॅथलेटिक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या स्पर्धेत शाळेच्या ३० विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थ्यांनी पदके आणि प्रमाणपत्रे मिळवली.

  • सुवर्णपदक विजेते: श्लेशा काळे, श्रावणी पिंगळे, प्रणय जगताप
  • रौप्यपदक विजेते: सई नांगरे, श्रेयश भोसले, धवल नलावडे, संघर्ष मोरे
  • कांस्यपदक विजेती: आतिफा मुलानी

अभिनंदनाचा वर्षाव

संस्थेचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे तसेच मुख्याध्यापिका अंजुम शेख व क्रीडा शिक्षक सुहास कदम यांचे अभिनंदन केले.