
अकलूजमध्ये राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचा जल्लोष; सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त भव्य आयोजन
अकलूज : सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त अकलूज येथील स्मृतीभवन, शंकरनगर येथे दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
ही माहिती अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
लावणीचा वैभवशाली प्रवास
जयंती समारंभ समितीचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी सहकार महर्षींच्या अमृतमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त जानेवारी १९९३ पासून राज्यस्तरीय लावणी स्पर्धेला प्रारंभ केला होता. सन २०१८ पर्यंत अखंड सुरू राहिलेल्या या स्पर्धेमुळे अनेक लावणी कलाकारांना राज्य, देश आणि परदेशातही कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली.
या व्यासपीठातून अनेक कलावंतांना चित्रपट व रिअॅलिटी शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली असून अकलूजची लावणी देशाबरोबरच परदेशातही पोहोचली आहे.
समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी २०२४ पासून या स्पर्धेला नवचैतन्य देत पुन्हा जोमाने सुरुवात केली असून आजही त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू आहे.
२९ वे वर्ष – बादशाही रंगमंचावर रंगणार लावणीचा जल्लोष
यंदाचे स्पर्धेचे २९ वे वर्ष असून स्मृतीभवन, शंकरनगर येथील बादशाही रंगमंचावर महाराष्ट्रातील ११ निवडक पार्थ्यांचा सहभाग असणार आहे.
पारंपरिक व नवकवींच्या लावण्यांचा नजराणा, ढोलकीची दमदार थाप, घुंगरांचा नाद, पदन्यासाची नजाकत आणि पेटी-तबल्याची संगत यांचा सुरेख संगम रसिकांना अनुभवता येणार आहे.
भव्य पारितोषिकांची लयलूट
磊 प्रथम क्रमांक – ₹ ३,००,०००
賂 द्वितीय क्रमांक – ₹ २,००,०००
雷 तृतीय क्रमांक – ₹ १,००,०००
उत्कृष्ट नृत्यांगना – ₹ ५,००० व कै. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील स्मृतीचषक
उत्कृष्ट अदा (वैयक्तिक) – ₹ ५,०००
उत्कृष्ट मुजरा – ₹ ३,०००
論 उत्कृष्ट ढोलकीपटू – ₹ १,०००
उत्कृष्ट पार्श्वगायिका – ₹ १,०००
उत्कृष्ट पेटीवादक – ₹ १,०००
論 उत्कृष्ट तबलावादक – ₹ १,०००
स्पर्धेतील सहभागी पार्थ्या
शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६
वैशाली समसापुरकर – जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी
काजल-स्वाती जळगावकर – अलंकार सांस्कृतिक कला केंद्र
बेला, श्रद्धा नेटूरकर – जय भवानी सांस्कृतिक कला केंद्र, खोसपुरी पंढरीचापूल, जि. अहिल्यानगर
अपर्णा, कीर्ती नगरकर – लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी, जि. पुणे
गोकुळ शिरगाव – सांस्कृतिक कला केंद्र, ता. कागल, जि. कोल्हापूर
रविवार, दि. १ मार्च २०२६
छाया, पूजा, श्रद्धा कोल्हापूरकर – रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, अंबप वाठार, जि. कोल्हापूर
जोत्स्ना वाईकर – पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र
नटरंग सांस्कृतिक कला केंद्र – वेळे, ता. वाई, जि. सातारा
ग्रुप पार्टी – मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर
राजनंदिनी सांस्कृतिक कला केंद्र – यवत चौफुला, जि. पुणे
वैष्णवी कोल्हापूरकर – रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, अंबप वाठार, जि. कोल्हापूर
प्रवेशिकेसाठी संपर्क : ९७६४११३६९५
या पत्रकार परिषदेस समितीचे सुभाष दळवी, महादेव अंधारे, अशोक जावळे, विजय दोशी, पोपटराव भोसले पाटील, बिभिषन जाधव, संजय गळीतकर, सुहास थोरात, सतीश यादव व इतर सदस्य उपस्थित होते.
अकलूजमध्ये रंगणाऱ्या या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेमुळे सांस्कृतिक परंपरेला नवे बळ मिळणार असून रसिकांना दोन दिवस लावणीच्या ठेका-तालाचा अविस्मरणीय अनुभव घेता येणार आहे.
l





