
दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी झाली, ज्यात एक लहान मूल आणि एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला. तर किमान 10-12 लोक जखमी झाले आहे.
ऐन दसऱ्याच्या दिवशी देशभरात विविध दुर्घटना घडत आहेत. आज सकाळच्या सुमारास गुजरातमधे एक निर्माणाधीन पूल कोसळवल्याची घटना ताजी असतानाच, आता बिहारमधून एक घटना समोर येत आहे. बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात दुर्गादेवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांनी मंडपात एकच गर्दी केल्याने चेंगराचेंगरी (Stampede in Dashahara) झाली आहे. या घटनेत महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर सध्या सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे सुद्धा वाचा
काही दिवसापुर्वी बिहारमधील मुंगेरमध्ये दसरा मेळ्यात अचानक चेंगराचेंगरी होऊन तीन जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एक बालक आणि दोन महिलांचा समावेश आहे. आता गोपालगंज शहरातील साखर मिल रोडवर असलेल्या राजा दालजवळ ही घटना घडली. आश कुमार (५), उर्मिला देवी (५५) अशी मृतांची नावे आहेत. शुभम कुमार (५ वर्षे) यांची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टरांनी त्यांना चांगल्या उपचारासाठी गोरखपूरला रेफर केले आहे, तर राणी कुमारीवर सदर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रचंड गर्दी आणि चेंगराचेंगरी पाहता जिल्हा प्रशासनाने सध्या दुर्गादेवीचे दर्शन बंद केले आहे.










