Stampede During Concert In Kerala | केरळमध्ये विद्यापीठात मोठी दुर्घटना, म्युझिक कॉन्सर्ट सुरू असताना चेंगराचेंगरी, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
14
Stampede  During Concert In Kerala  | केरळमध्ये विद्यापीठात मोठी दुर्घटना, म्युझिक कॉन्सर्ट सुरू असताना चेंगराचेंगरी, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)


कॉन्सर्ट रंगात असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे बाहेर थांबलेल्या लोकांनी आश्रय घेण्यासाठी ऑडिटोरियममध्ये धाव घेतली, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची गर्दी झाली.

कोची : केरळमधून मोठी बातमी समोर येत आहे. केरळच्या कोची ( Kerala University) येथील विद्यापीठात एका म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान चेंगराचेंगरी (tampede During Concert) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, किमान ६४ जण जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं

कोचीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात शनिवारी ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. विद्यापीठात एक टेक फेस्ट आयोजित केला जात होता आणि यावेळी गायिका निखिता गांधी कॅम्पसमधील ओपन-एअर ऑडिटोरियममध्ये परफॉर्म करत होती. कॉन्सर्ट रंगात असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे बाहेर थांबलेल्या लोकांनी आश्रय घेण्यासाठी ऑडिटोरियममध्ये धाव घेतली, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची गर्दी झाली. जाण्यायेण्यास जागा अपुरी पडल्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि बरेच  विद्यार्थी खाली पडले. यावेळी चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, किमान ६४ जण जखमी झाले.






Source link