
बॉलिवूडमधील अतिशय गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘दिल चाहता है.’ या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दिसली होती. या चित्रपटातून सोनालीला तुफान लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वी सोनालीचा लव्ह स्टार हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, सोनालीला अनेक जुन्या चित्रपटांविषयी विचारण्यात आले होते. त्यावेळी तिला संजय दत्तसोबत दिलेल्या इंटिमेट सीनवर देखील प्रश्न विचारण्यात आला होता. चला जाणून घेऊया अभिनेत्री काय म्हणाली.






