
सोनाक्षीने नुकतेच ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत जहीरविषय वक्तव्य केले होते. ‘”मी खूप आनंदी आहे कारण मला वाटते की मी असे काही केले ज्याची मी बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. आता मी जिथे असायला हवे होते तिथे पोहोचले आहे. मला जहीरसोबत वेळ घालवायला खूप आवडत आहे. त्यासाठी मी काही काळ घरीच आहे. यापूर्वी मी काम संपवून कधी जहीरला भेटते असे मला वाटायचे. माझी खूप आधीपासून इच्छा होती की आम्ही एकत्र यावे, पण एकत्र यायला फार वेळ लागला” असे सोनाक्षी म्हणाली.








