
फलटण (ता. फलटण): निंबळक (ता. फलटण) येथे रविवार, दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता राजे गटाची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा बैठक पार पडली. या बैठकीत राजे गटाच्या वतीने निंबळक येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैशालीताई कांबळे यांना बरड जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी, अशी आग्रही व एकमुखी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली.
सामाजिक, शैक्षणिक व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात सौ. वैशालीताई कांबळे यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत, त्या या गटासाठी योग्य व सक्षम उमेदवार ठरतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. स्थानिक जनतेशी असलेला त्यांचा थेट संपर्क व सामाजिक कामाचा अनुभव लक्षात घेता त्यांना संधी द्यावी, अशी भावना बैठकीतून व्यक्त झाली.
यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण यांचे उपस्थित ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मान्यवर म्हणून
मा. श्री. भोजराज नाईक निंबाळकर (गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटी),
मा. श्री. वामनराव यादव (माजी सदस्य, पंचायत समिती),
मा. श्री. दत्तात्रय शिंदे (संचालक, श्रीराम सहकारी साखर कारखाना, फलटण),
मा. श्री. दादासाहेब कापसे (माजी चेअरमन, निंबळक विविध कार्यकारी सोसायटी),
मा. श्री. धनंजय कदम (चेअरमन, निंबळक विविध कार्यकारी सोसायटी),
मा. श्री. मेघराज मोहनराव नाईक निंबाळकर (चेअरमन, श्री संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, निंबळक),
श्री. शंभूराज नाईक निंबाळकर (संचालक, मालोजीराजे सहकारी बँक, फलटण),
श्री. निमराज, विश्वराज, कृष्णराज नाईक निंबाळकर,
श्री. देवानंद कापसे (जनरल मॅनेजर, संत ज्ञानेश्वर नागरी पतसंस्था),
मा. श्री. रवींद्र भोसले (माजी उपसरपंच, निंबळक),
मा. श्री. बाबासाहेब गंगावणे (माजी प्राचार्य, मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण)
यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, राजे गट आगामी निवडणुकीत सक्षम व लोकप्रिय उमेदवार देण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट झाले.







