
पहिल्याच चित्रपटात काम केल्यानंतर स्मिता पाटील यांच्या करिअरला वेग आला. त्यांचा अभिनय इतका दमदार होता की, पुन्हा त्यांना मागे वळून पाहावेच लागले नाही. त्या एकापाठोपाठ एक दमदार चित्रपट करत राहिल्या. समांतर चित्रपट असो वा मुख्य प्रवाहातील चित्रपट, स्मिता पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली. स्मिता पाटील यांनी ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘द नक्सलाइट्स’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है’, ‘चक्र’, ‘नमक हलाल’, ‘बाजार’, ‘शक्ती’, ‘अर्थ’, ‘अर्ध सत्य’, ‘मंडी’, ‘शराबी’, ‘अनोखा रिश्ता’, ‘मिर्च मसाला’ आणि ‘वारिस’ या चित्रपटांमध्ये काम केले होते. या सगळ्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांचे खूप कौतुक झाले.








