
मनोरंजन विश्वात अभिनेता म्हणून पाऊल ठेवण्यापूर्वी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. या आधी त्याने काही जाहिरातींमध्ये काम देखील केले होते. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा २००८ मध्येच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होता. प्रियांका चोप्रा, कंगना रनौत यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘फॅशन’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेणार होता. मात्र, त्यावेळी एका मॉडेलिंग मॅगझिनसोबत सुरू असलेल्या करारामुळे सिद्धार्थला ती भूमिका आणि चित्रपट स्वीकारता आला नाही. त्यामुळे त्याचं फिल्मी दुनियेतलं पदार्पण देखील लांबणीवर पडलं. मात्र, यानंतरही त्याची अभिनयाची आवड जराही कमी झाली नाही. त्याने नेहमीच आपले प्रयत्न सुरू ठेवले.







