Siddharth Jadhav: ‘मी त्यांना जग बघायला पाठवतोय…’; मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवची पोस्ट वाचून वाटेल कौतुक!

0
39
Siddharth Jadhav: ‘मी त्यांना जग बघायला पाठवतोय…’; मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवची पोस्ट वाचून वाटेल कौतुक!


अभिनेत्याने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलेय की, ‘हाच तो क्षण… आई बाबांचा पहिला परदेश दौरा… माझ्यासाठी हा क्षण किती महत्त्वाचा आहे, हे मी शब्दात नाही सांगू शकत. त्यांच्या आशीर्वादाने ‘मी जग बघायला फिरलो’ आणि आज त्यांच्याच आशीर्वादाने ‘मी त्यांना जग बघायला पाठवतोय…’. त्यातला आज त्यांचा हा ‘पहिला प्रवास…’. माझ्या शाळेतल्या पहिल्या सहलीपासून ते आतापर्यंत लंडनला शूटला जाईपर्यंत जी उत्सुकता, जो आनंद, त्यांना असायचा तशीच किंवा त्यापेक्षा जास्त उत्सुकता, तसाच आनंद आज मला वाटतोय…. ते मला जे नेहमी सांगायचे तेच आज मी त्यांना सांगतोय.. तुम्ही मज्जा करा.. माझी काळजी नको.. मी आहे तुमच्यासोबत…..कायम….’ सिद्धार्थ जाधवची ही पोस्ट वाचून चाहते आता त्याचं तोंडभरून कौतुक करत आहेत.



Source link