Siddarth Jadhav Birthday: मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवने बॉलिवूडमध्ये एंट्री केली कशी? वाचा…

0
16
Siddarth Jadhav Birthday: मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवने बॉलिवूडमध्ये एंट्री केली कशी? वाचा…


Happy Birthday Siddarth Jadhav: आपल्या दमदार अभिनयाने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारा मराठमोळा चेहरा म्हणजे अभिनेता सिद्धार्थ जाधव. आज (२३ ऑक्टोबर) ‘आपला लाडका सिद्धू’ अर्थातच सिद्धार्थ जाधव याचा वाढदिवस आहे. मराठी चित्रपट आणि नाटकांतून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सिद्धार्थ जाधव याने आता हिंदी प्रेक्षकांनाही भुरळ घातली आहे. मराठी ते बॉलिवूड हा त्याचा प्रवास खूप रंजक होता. सिद्धार्थ जाधव यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९८१ रोजी रत्नागिरी येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव रामचंद्र आणि आईचे नाव मंदाकिनी जाधव आहे. सिद्धार्थ जाधव मध्यमवर्गीय कुटुंबातुन पुढे आला असून, त्याचे प्राथमिक शिक्षण शिवडी महापालिका मराठी शाळा आणि माध्यमिक शिक्षण सरस्वती हायस्कूल, नायगाव दादर येथे झाले. तर, रुपारेल कॉलेजमधून त्याने पदवी शिक्षण पूर्ण केलं.



Source link