
Shriyut Non Maharashtrian Marathi Movie Teaser: मराठी माणूस म्हटलं की, तो रिस्क घेऊन उद्योग करण्यापेक्षा नोकरी करण्यामध्ये समाधान मानणारा आहे. आपल्या सभोवताली अनेक बेरोजगार तरूण स्वतःचा छोटा, मोठा व्यावसाय सुरू करण्याचा प्रयत्न न करता नोकरी शोधण्याच्या मागे लागलेले दिसतात. अगदी हातावर मोजण्या इतक्या नोकरीच्या जागांसाठी अनेकदा हजारोंच्या घरात अर्ज येतात. आपल्या समाजातील हे भयाण वास्तव आहे. त्यातच नोकरभरातीतील भ्रष्टाचार आणि पेपरफूटी प्रकरण, तर नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येक उमेदवारांच्या प्रवासातील मोठे अडथळे ठरत आहेत. याच गंभीर विषयाला वाचा फोडणारा ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून, या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.