श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर : पाणी, सत्ता आणि परिपक्व नेतृत्वाचा राष्ट्रीय ब्रँड

0
44
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर : पाणी, सत्ता आणि परिपक्व नेतृत्वाचा राष्ट्रीय ब्रँड

फलटण प्रतिनिधी :- श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे एक राजकीय क्षेत्रातील राष्ट्रीय ब्रॅण्ड आहेत .मनावर घेणे व मनात आणलं तर कोणत्याही क्षेत्रावर आपली हुकूमत प्रस्थापित करणे जर ठरवलं तर मग ठरलं हे त्यांचें एक मोठे वैशिष्ट्य आहे.
म्हणून अनेकांना कधी वर्ज्य वाटत नाहीत.
सर्वव्यापी व अद्ययावत असा अदृश्य हात …!
Love him or hate him, but you can ‘t ignore him…हे वाक्य अगदी श्रीमंत रामराजे यांना अगदी तंतोतंत लागू होते .
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना 1996 मध्ये महाराष्ट्र शासनाने, मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली केली. ज्याचा मुख्य उद्देश कृष्णा खोऱ्यातील जलसिंचन प्रकल्प जलद गतीने पूर्ण करणे, कृष्णा नदीच्या वाट्याच्या पाण्याचा वेळेत विनियोग करणे आणि परिसरातील पाणी व्यवस्थापन सुधारणा होत ज्यामुळे सिंचन क्षमता वाढेल व  दुष्काळी भागाचा विकास होईल.
1995 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजप युतीचे सरकार मा .मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले मात्र अपक्ष आमदारांचा पाठिंबा यामागे असल्यामुळे व सिंचनाच्या माध्यमातून राजकीय पाठबळ देणे किंवा मिळणे हा एक हेतू होता.
या सर्वामागे मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या दूरदृष्टी कोनातून पश्चिम महाराष्ट्रातून हळूवारपणे एक आदर्श व पाणी प्रश्न बाबतीत संवेदनशील असलेले अभ्यासू नेतृत्व पवार साहेबांनी वेळीच हेरले होते व ते होते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या रुपाने निर्माण केले.
कृष्णा पाणी तंटा लवादाचा निर्णय सन 1975-76 दरम्यान झाला होता त्या लवादाच्या निर्णयानुसार राज्याला मिळालेल्या पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक होते.
त्या दरम्यान शासनाने पाटबंधारे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी 5 विकास महामंडळाची स्थापना केली त्यापैकी हे एक होते.
सिंहावलोकन केल्यास जलसंपदा विभागाला (पूर्वीचा पाटबंधारे विभाग) १५० वर्षाचा इतिहास आहे.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती १९६० साली झाली त्या दरम्यान पूर्वीच्या मुंबई राज्याचे विभाजन महाराष्ट्र व गुजरात मध्ये झाले, १९६० साली सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाटबंधारे विभाग व ईमारत/ रस्ते विभाग असं विभाजन झाले, नंतर काही दशकानंतर २००४ पासून पाटबंधारे विभागाचे जलसंपदा विभाग म्हणून नामकरण करण्यात आले सन १९९५ पासून महाराष्ट्र राज्य व प. महाराष्ट्र च्या ऐतिहासिक पाणी प्रश्न व्यवस्थापन सुधारणा चे साक्षीदार व मंत्री म्हणून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे वैविध्यपूर्ण असे आहे व ते आपल्या फलटण करांन करता वैभवशाली व गौरवशाली आहे.
मा .विलासराव देशमुख मुख्यमंत्री पदी असताना महसूल राज्यमंत्रीपद देण्यात आले होते, २००४ मध्ये त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली, सातारा जिल्हा च्या पालकमंत्री पदांची काही वर्ष धुरा समर्थपणे सांभाळली, २०१३ मध्ये राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून सुध्दा वर्णी लागली होती
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अनेक योजनांचे व विकास पर्वाचे माझ्या सहित अनेक जण साक्षीदार आहे
मतदारसंघ राखीव झाल्याने रामराजे यांचे पुनवर्सन करणे आवश्यक होते म्हणून २०१० ला पवार साहेबांनी पहिल्यांदा विधानपरिषद वर संधी उपलब्ध करून दिली तशी त्यांना तीन वेळा संधी मिळाली व एका टर्म मध्ये विधानपरिषद चे सभापती म्हणून संधी दिली त्यांनी प. महाराष्ट्र बरोबर फलटण खंडाळा लोणंद माळशिरस तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी अलौकिक असे समाजहिताचे काम केले म्हणून त्यांना मानणारा वर्ग व मतदार या भागात प्रचंड प्रमाणात आहे.

महाराष्ट्र राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार महाराष्ट्रात एकूण ४०० नद्या आहेत. महाराष्ट्र राज्याला सिंचनाची जुनी परंपरा आहे . आपल्या कडे कालवा पध्दतीने सिंचन करण्याच्या मुद्यावर व उत्क्रांती मध्ये सर एम. विश्वेशवरैया यांचा सिंहाचा वाटा आहे .
लोकसहभागातून सिंचन पद्धतीचे व्यवस्थापन तंत्र सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याने अंगिकारले आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उच्च विद्याविभूषित , सुसंकृत राजकारणी म्हणून आजही त्यांच्याकडे पाहिले जाते.
रामराजे हे राजघराण्यातील असले तरी खरोखरच राजकीय राजयोग उपभोगला आहे.
१९९१ ला ऐतिहासिक फलटण नगरीचे नगराध्यक्ष .. १९९५ ते २०१३ पर्यंत ते लाल दिव्याच्या गाडीतच होते. काँग्रेस राष्ट्रवादी चे सरकार गेल्यानतर त्यांच्या साठी राष्ट्रवादी ने विधानपरिषद सभापती वर अविश्वास ठराव आणला होता आणि पुन्हा रामराजे लाल दिव्यातच राहिले .
रामराजे यांच्या कडे अनेक वर्षे कृष्णा खोरे विकास महामंडळ होते, कारण त्यांचा पाणीप्रश्नी खूपच प्रचंड प्रमाणात अभ्यास व अनुभव पदरी होता म्हणून त्यांची या विषयातील व्यासंगी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती व आहे म्हणून यांचे योगदान पाणीप्रश्नी खूप उल्लेखनीय आहे.
Maharashtra ‘s powerful leader Ram Raje Naik Nimbalkar…..!!!

माझं सुंदर फलटण…. स्वच्छ फलटण…मी फलटण कर…!