Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रअकलूजची सत्ता शिवरत्नांच्या हाती: सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाचे नवे समीकरण

अकलूजची सत्ता शिवरत्नांच्या हाती: सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाचे नवे समीकरण

अकलूज :- धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माढा लोकसभा आणि प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर लोकसभा विजयानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय गणितं पूर्णपणे बदललेली दिसत आहेत. अकलूजचा शिवरत्न म्हणजेच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचं नेतृत्व आता सोलापूरच्या राजकीय सत्तेचं केंद्रबिंदू ठरत आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशिल मोहिते पाटील निवडून आल्यावर जिल्ह्यात मोठा उत्सव साजरा झाला. विशेष म्हणजे, माढ्यातील आमदार राम सातपुते यांची धुळधाण झाल्यावर जनतेने आणखी मोठ्या आनंदात विजयाचं स्वागत केलं.

धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात माढा तालुक्यातील शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी अतिशय प्रभावीपणे काम करून माढा विधानसभा मतदार संघात मोठी आघाडी मिळवून दिली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या संघटनेच्या बळावर माढ्यातील आमदारांना शह दिला, ज्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाला मोठं वळण मिळालं आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेली जनतेची सहानुभूती आणि मोहिते पाटील परिवाराची राजकारणातील अचूकता यामुळे धैर्यशिल यांचा विजय ठरला आहे. शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी या निवडणुकीत जनतेचं समर्थन मिळवून भविष्यात माढा तालुक्याचं नेतृत्व करण्यासाठी सिद्ध असल्याचं दाखवून दिलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघासाठी नवा आमदार म्हणून जनमानसात आपली प्रतिमा निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली माढ्यातील विकासाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments